Wednesday, 29 November 2017

“माझा अनुभव – माझ्या शब्दात”

मित्रांनो, केंद्रासमोर दिसणाऱ्या बेकारांच्या प्रचंड रोगांचे भेसूर आणि गर्दीचे दृश्य पाहिलं की मनात विचार येतो कि, नोकरी करण्याशिवाय आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही काय? नाही मित्रांनो आपल्या पुढे एक पर्याय आहेत पण त्यासाठी धडपड हवी आणि स्वतः मध्ये स्वाभिमान हवा.

मित्रांनो, मी स्वत: लहान वयापासून उद्योगी प्रवुतीचा व्यक्ती आहे. छोटे छोटे उद्योग करत समाजात वावरणे गरजेपुरते चार पैसे कमविणे व शिक्षण घेणे असे ( Earn and Learn ) हे माझे सुरु होते. अशी परिक्रमा चालू होती. कमवत कमवत शिकत असतांना मी शिक्षण ही चांगले मिळवले. चार पैसे कमवत कमवत मी आय.टी.आय (इलेक्ट्रिक) पूर्ण केले. इलेक्ट्रिक फिटिंग च्या कामामध्ये जम बसला. मग मी ठरविले कि, इलेक्ट्रिक फिटिंग चे  काम करून सुरवातीला चार पैसे कमवायचे व आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करायच्या. मी माझ आय.टी.आय वर्धेला पूर्ण केले. हिंगणघाट हे माझ जन्म गाव. माझ आय.टी.आय संपल व मी हिंगणघाट ला परत आलो. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. कसही करून घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता चार पैसे  कमविणे हे माझे उद्धिष्ट बनले. मला इलेक्ट्रिक फिटिंग चे काम येत होते. पैसे कमविण्यासाठी मी गावात फिटिंग चे काम सुरु केले पण कुठल्याही उद्योग सुरु करतो म्हटलं तर ओळखी पाहिजे तुम्हाला कदाचीत माहित असेल आपल्या अंगी हुनर पाहिजे. नाहीतर उद्योग सुरु करायला पैसे पाहिजे व उद्योग सुरु झाल्यावर उद्योग वाढवायला ओळखी पाहिजे. माझ्या जवळ प्रत्यक्ष हुनर असल्यामुळे मला पैशाची गरज नव्हती. मला फक्त कामाची गरज होती. नवीन व्यक्तीला काम देतांना लोक विचार करतात. हे सत्य आहे. मग प्रश्न होता इलेक्ट्रिक फिटिंगचा उद्योग वाढवायचा कसा ? कसही करून पैसे कमविणे हाच ध्यास. कारण परिस्तिथी ला अनुसरून माणसाला जागावं लागत. मी बारावी सायन्स केलं होत. कामात भरभराटी येण्यासाठी ओळखी आवश्यक आहे. मग काय करायचं. मी B.Sc(Math) पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला पण कामाच्या व्यापामुळे मला नियमित कॉलेजला जाता आलं नाही. एक दिवस मी कॉलेजमध्ये गेलो असता सरांनी मला म्हटलं, तू गैरहजर का राहतो ? गैरहजर राहायचं होत तर B.Sc मध्ये का प्रवेश घेतला ? ‘बी.ए.’ तू गैरहजर राहून करू शकतो. तेव्हा मी सरांना माझी परिस्थिती समजावून सांगितली सरांना म्हटलं कि, मला इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामाला जावे लागते, घरची परिस्थिती वाईट असल्यामुळे मी येऊ शकत नाही. सरांनी मला प्रश्न विचारला तू इलेक्ट्रिक फिटिंग चे काम करतो ? होय सर, मग इथले कॉलेजचे काम कर. मला माझ्या उद्योगाची सुरुवात पाहिजे होती. मला वाटलं मला आता सुवर्णसंधी मिळाली. मला आता संपूर्ण कॉलेजचे काम मिळणार B.Sc  मध्ये प्रवेश घेण्याच्या माझा उद्देशही तोच होता. माझा उद्देश साध्य झाला व मला इलेक्ट्रिक फिटिंगचा contract मिळाला.
              
           कॉलेज मध्ये इलेक्ट्रिक फिटिंग च्या कामाची सुरुवात झाली व मी कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकच्या कामासाठी प्रसिद्ध झालो व ओळखी वाढली म्हणून मला चांगल्या प्रकारे काम मिळायला सुरुवात झाली. दुसऱ्याकडे नौकर राहून रात्र दिवस काम करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरु झाला. स्वतःहा मी फिटिंग चे CONTRACT घेतल्यामुळे पैसे कमवण्याचे प्रमाण वाढले घरची परिस्थिती सुधारली.

           ह्या उद्योगाची सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला काही दिवस मी  रोजंदारीने इलेक्ट्रिक फिटिंग चे कामे केली. मी कामगाराचे व नोकराचे जीवन प्रत्यक्ष अनुभवले. जो कामगार मोठमोठे घरे बांधतो, इमारत उभारतो, तो मात्र झोपडपट्टी राहतो, तो इमानदार असूनही त्याच्या वाट्याला नेहमी शिव्या आणि अवहेलनाच येते. वन-वन कष्ट करूनही त्याला सुखाचे दोन वेळ खायला मिळत नाही. मान सन्मान तर दूरची गोष्ट त्याच्या वाट्याला नेहमी शिव्या येतात. ही गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवली एखाद्या मोठ्या व्यक्तीला आदराने नमस्कार जरी केला, तरी ते फालतूच कारण त्याला response भेटण्याचे chances नसतात. कारण कामगार म्हणजे कुठेतरी काम करणारा नोकर.
            ह्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर मी स्वत:च  electric fiting चे contract घेतले. मला स्वत:चा उद्योग सुरु करण्याचा आनंद मिळाला. कामात जम बसल्यामुळे स्वता:चे वेल्डिंग वर्कशॉप टाकायचे मी ठरविले. शासन, शिकलेल्या बेरोजगारांना उद्योगासाठी लोन देते असे मी ऐकत आलो. आता मात्र मी प्रत्यक्ष लोन काढायला निघालो. पण ग्यारंटर नाही. उद्योग टाकायला जागा नाही वय कमी असल्यामुळे काही गोष्टी समजत  नव्हत्या भरपूर प्रयत्न केला, खटाटोप केली पण काही ते  जुळल नाही व मी तो नाद सोडला.
      
             Electric Fiting चे काम करत असतांनाही मी माझा आभ्यास सोडला नाही. परीक्षा जवळ आली. परीक्षेच्या वेळेला दीड दोन महिने आभ्यास करून B.Sc (1year) पास झालो.

माझ इंग्रजी सुरवातीला थोड बर होत. उन्हाळाच्या कालावधीत मी स्पीकिंगचा कोर्स लावला व इंग्रजीच चांगल ज्ञान ग्रहण केलं.  इलेक्ट्रिक फिटिंग च्या उद्योगापेक्षा कोचिंग चा उद्योग हा भरभराटीचा नाव आणि लौकिक मिळवून देणारा असतो असं मी वारंवार ऐकत होतो. मग मी ठरवल दहा बरा तास मेहनतीच व भीती फोडण्याच काम करण्यापेक्षा  जर इतकाच आभ्यास स्वत:च्या विषयाचा केला व स्पीकिंगच्या विषयामध्ये खोल गेलो तर पैसाही मिळेल व संन्मानही.  मी माझ्या  हुशार मित्राकडे स्पीकिंग केल्यामुळे मला स्पिकिंगच्या क्लासचे फंडे माहित होते. त्यामुळे मी जोरदार मेहनत घेऊन स्पिकिंग क्लास सुरु केला मला लहान वयापासूनच मेह्नीतेचे महत्व कळते. कारण गरीबाचा मुख्य शस्त्र हे मेहनत आहे. स्वतःचा विकास घडवून आणावयाचा असेल तर मेहनत आणि योग्य बुद्धिमत्ता हि वापरलीच पाहिजे कारण कुठलाही व्यक्तीला तो गरीब असो वा श्रीमंत, विकास (प्रगती) करण्याचे एकमेव शस्त्र म्हणजे मेहनत. आपलं शस्त्र म्हणजे आपली मेहनत. मेहनत हि आपली बाजू मजबुत करण्याचे शस्त्र आहे. त्याला धार देत राहिलं पाहिजे. त्याला खत पाणी घातलं पाहिजे.

मराठी माणूस कुठल्या विषयाला भीत असेल तर इंग्रजीला. इंग्रजी या विषयामुळे मराठी माणसाचा आत्मविश्वास  डगमगतो. आता इंग्रजी हि जागतिक भाषा झाली आहे. एका व्यक्तीला संपूर्ण जगापर्यंत व्यापक व्हायचं असेल तर इंग्रजी शिकलं पाहिजे त्याला इंग्रजी लिहिता, वाचता व बोलता यायलाच पाहिजे कारण आजच्या जागतिकीकरणाच्या  युगात इंग्रजी भाषेशिवाय किवा इंग्रजी ज्ञाना शिवाय पर्याय नाही. पुष्कळ क्षेत्रामध्ये आपला मराठी माणूस मागे पडतो तो इंग्रजीनेच, उद्योग धंद्यामध्ये इंग्रजी, नोकरी मध्ये इंग्रजी, साधा MS-CITचा कोर्स म्हटलं तरी इंग्रजी, बाजारांमध्ये टी-शर्ट विकत घ्यायला जातो म्हटलं तरी त्या T-SHIRT वर जि डिझाईन असते  किवा नाव लिहलेले असते ते पण इंग्रजीत म्हणजे जिकडे तिकडे इंग्रजी, मग आपल्या मराठी माणसाला प्रगती करायची असेल तर इंग्रजीचे ज्ञान, लिहिणे, वाचणे, बोलणे, ही क्रिया विकसित केली पाहिजे.  स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. आपल्या देशाची ७०% जनता खेड्यात राहते. खेडयामध्ये इंग्रजी च्या बाबतीत अतिशय बिकट परिस्थिती आहे. हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यानी पहिले. ज्या गरिबांची मुले प्राथमिक शाळेत शिकतात, त्यांना इंग्रजी हा विषय नकोसा होतो. याची कारणे पुष्कळ असू शकतात. पण एक कारण म्हणजे शिक्षक जो शाळेमंध्ये इंगजी शिकवतो त्याला स्वत: इंग्रजी ट्रेनिंगची आवशकता असते. पाया कच्चा झाल्यामुळे ते विद्यार्थ्यापुडे टिकाव धरू शकत नही. वर्ग दहा पर्यंत खेड्यामध्ये शिकलेले विद्यार्थी अचानक शहरात आले की शहरातील विद्यार्थ्या बरोबर स्वत:ला स्पर्धेत टिकवू शकत नाही. याचा परिणाम त्यांच्यात न्यूनगंड तयार होतो. मी हि परिस्थिती अनुभवली आहे. या सर्व गोष्टी चे आकलन केले. त्यामुळे माझ्या माध्यमातून इंग्लिश स्पीकिंग आणि व्यक्तिमत्व  विकास सारखा दर्जेदार course प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून तयार करण्यात आला. पाच वर्षाच्या माझ्या शिकवणीच्या अनुभवातून मी माझ्या COURSE  मध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, त्यांची ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन काही बदलही केले आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्याच्या वाढत्या प्रतिसादाने मला प्रोस्ताहित केले व त्यांच्या प्रोत्सानामुळे मी माझे चार पुस्तके मार्केट मध्ये आणू शकलो. B.Sc 2nd year च्या सुरुवातीच्या दिवसा पासून स्पीकिंगच्या कोचीन्ग्ला सुरुवात केली. माझ्या शिकवण्याच्या व विषय मांडण्याच्या उत्कृष्ट कलेमुळे मला या क्षेत्रात वाव मिळत गेला. मी स्पिकिंगची कोचिंग घेता घेता B.Sc व B.Ed पूर्ण केल. मध्येचं B.A Additional ELT झाले. इंग्लिश स्पिकिंग व व्याक्तीमत्व  विकास हा कोर्स किती उपयुक्त आहे हे विद्यार्थ्याला कळलं. मलाही कळलं कि समाजामध्ये विद्यार्थ्याच्या इंग्रजी विषयाबद्दल काय समस्या आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा न्यूनगंड आहे. त्यासाठी कुठल्या उपाययोजना प्रत्यक्षात आमलात आणल्या पाहिजे. अशा प्रकारे माझा प्रवास सुरळीत चालु  होता.

विशिष्ट शिक्षण झाल्यानंतर नोकरीच FAD येत प्रत्येक मराठी माणसाला वाटत नोकरी म्हणजे सन्मान, नोकरी म्हणजे प्रतिष्ठा, नोकरी म्हणजे जीवन, नोकरी म्हणजे सर्व काही.
            
             मित्रांनो ! तुम्ही कधी ‘नोकरी’ ह्या शब्दाचा  अर्थ समजून घेतला आहे काय ? नोकरी शब्दातली ‘री’ वरील वेलांटी काढून टाका आणि तो शब्द लिहून पहा तो शब्द ‘नोकर’ असा होतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याची नोकरी करता, तेव्हा तुम्ही दुसऱ्याचे चक्क नोकर होता आणि मित्रानो नोकर ह्या शब्दाला दुसरे सामनार्थी शब्द आहेत. गडी, सेवक, चाकर, दास. तुम्हाला कोणी गडी किवा चाकर म्हटलं तर चिडता पण नोकराने चिडून काय होणार ? नोकराने कधी चिडायच नसतं त्याने आपल्या मालकाची इमानदारीने सेवा करायची असते. मालकाने फेकलेल्या तुकड्यावर जगायचं असते. मित्रांनो गळ्यात टाय अडकली तरी तुम्ही नोकरच आहात हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मराठी माणसाचे वैभवाचे दिवस येतील.

मित्रांनो मराठी माणूस हा कधीच गुलामगिरीतून बाहेर पडणार नही का ? मालक म्हणून तो / मालक बनून तो ताठ मानेने उभा राहू शकणारच नाही का ? हा प्रश्न वारंवार माझ्या मेंदूला भेडसावतो. मित्रांनो, भराडी माणसाला, वऱ्हाडी माणसाला पुरातन काळापासून नोकर राहण्याची सवय जडली आहे. सुरुवातीला काही उच्चभ्रू लोकांची गुलामी केली गुलामी करता करता दिवस गेले , नोकर राहून मालकाच्या चार तुकड्यावर जीवन गाठले नंतर इंग्रज भारतात व्यापारी म्हणजे उद्योजक म्हणून आले. त्यांनी आपल्यावर स्वामित्व प्रस्तापित केलं, आपण इथले नेहमीचे रहिवासी असूनही तेच आपले मालक बनले आणि त्यांनी आपल्याला गुलाम केल. मग त्यांनी नोकर निर्माण करण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात केली. कालांराताने त्यांना हवे असणारे इंग्रजी भाषा जाणणारे नोकर तयार झाले आणी त्यांनी नोकर तयार करून नोकराच्या सह्हायाने आपल्यावर चांगले दीडशे वर्ष राज्य केले.
            
           पुढे इंग्रज भारतातून गेले. ते गेले पण ह्या मराठी माणसामध्ये, भराडी माणसामध्ये गुलामिवृत्ती कायम राहिली. कारण एखाद्याला विचारले काय करतो. तो गर्वाने छाती फुगवून सांगतो. नोकरी करतो आणि ह्याबद्दल आम्हाला थोडीसुद्धा खंत वाटत नाही, उलट अभिमान वाटतो.
           
           मित्रांनो, माझा नजरेने मी नोकरी मिळविण्यासाठी धावपळ करणारी मराठी तरुण मंडळी पहिली. साध्या मराठी माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी दहा-दहा लाख डोनेशन देणारे लोकं पाहिले. नोकरीसाठी लाचार होणारे लोकं प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिले.
            
             समजा कुठेच WANTED ची जाहिरात नसेल तर स्वतःच्या जबाबदारीवर अर्ज करणारे मित्र मी पहिले आणि अर्जाचा शेवटी आपण नेहमी लिहितो “कृपया मला नोकरी द्यावी. मी वाट्टेल ते काम करायला तयार आहे. किंवा मला कसल्याही कामावर नेमले तरी मी आनंदाने ते काम करीन.”
            
             मित्रांनो ! पहा-पहा ! हे वरील शब्द, अशी आपल्याला लाचारी करावी लागते. पण हेच जर तुम्ही उद्योग करायचा म्हटलं तर, मालका सारखं आपण दोन शब्द सरसून बोलतो. आपल्या शब्द हा पूर्व दिशा असतो. स्वउद्योगामुळे आपलं व्यक्तिमत्व धडाडी व स्वाभिमानी बनतं.
            
             दुसरं चित्र EMPLOYMENT एक्सचेंजचं आहे. EMPLOYMENT एक्सचेंज मध्ये सर्व तरुण मित्र सरळ ह्या केंद्रात भरती होतो. ह्याचं कारण तुम्हाला स्वतःला नोकर म्हणून घेणं कमीपणाच न वाटता भूषणास्पद वाटत ! आणि हीच तर मराठी माणसाची शोकांतिका आहे.
            
            मराठी माणसे उद्योग व्यवसायात नाहीत हे फार जुने दुखणे आहे. त्यांची संख्या इतर भाषिकांच्या तुलनेने खूपच कमी आहे, यात काहीच शंका नाही. मराठी माणूस बेधडकपणे उद्योगात उतरत नाही. खरं म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा मनात नोकरीबद्दल तिरस्कार निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायाकडे स्वतःला वळवले पाहिजे. आज सर्व इतर समाज अगदी सुरुवातीपासून हेच करत आहे. कारण नोकरीचा खरा अर्थ नोकर हे फक्त त्यांनाच चांगल समजलं आहे. पण आपल्याला मात्र अंधारात ठेवल गेल आहे.
           
              मित्रांनो, नोकरीवाला आणि उद्योगवाला अशा दोन व्यक्तीत जेव्हा मी तुलना करतो तेव्हा मला असे दिसून येते कि, खरंच नोकरी करून आलेशान कारमधून फिरू शकतो का? हजार रुपये देवून एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याची तिकीट विकत घेवू शकतो का? जागतिक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी विमानातून प्रवास करू शकतो का? हि गोष्ट नोकरी करणाऱ्या व्यक्तीला परवडन्याजोगी नाही आहे. पण उद्योग करणाऱ्या व्यक्तीला मात्र ह्या गोष्टी सहज शक्य होते. म्हणूनच माझे मत आहे कि प्रत्येक मराठी माणसाने उद्योगात पडायला पाहिजे. कुठल्याही समाजाला व्यवसाय हि स्वत:ची मक्तेदारी समजण्याचे कारण नाही. प्रत्येक मराठी माणसांनी आपण नोकरी करायचीच नाही असा निर्धार केला पाहिजे. मराठी माणूस उद्योगात उतरल्या मुळे इतर लोकांचे धाबे दणाणतील कारण संपत्तीचे वाटेकरी तुम्ही बनाल, म्हणूनच मराठी माणसाला जाणून बुजून अशी समजूत करून देण्यात आली कि, व्यापार धंदा हे मराठी माणसाचे काम नाही. आणि दुर्दैवाने आपणही इतके दिवस असच समजून चालत आलो कि, आपलं हे कामच नव्हे! ह्याचीच कडू फळे आपण आता भोगत आहोत. पण आतामात्र उद्योगात शिरायचा निर्धार केला पाहिजे.
            
             मराठी माणूस स्पर्धेत टिकत नाही. हे असे का व्हावे ? मराठी माणसे यशस्वी का होत नाही ? याला अनेक करणे आहेत. त्या सर्वाचा येथे उहापोह करणे शक्य नाही. पण माझ्या मते पैशा बद्दलची तुच्छता, कारण कोणताही उद्योग सुरु करावा म्हटलं तर डोळ्यांसमोर भांडवल येते. भांडवल म्हटल्याने आपल्या डोळ्यापुढे फार मोठी रक्कम उभी राहते. भांडवल या शब्दानेच मराठी माणूस नाउमेद होतो. एवढी धास्ती मराठी तरुणांनी ह्या शब्दाची घेतली आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा कि काही उद्योग असे आहेत कि, त्यासाठी शंभर रुपये हे सुद्धा भांडवल होऊ शकते.
            
            काही उद्योगपती असे आहे कि ज्यांनी दहा रुपयावर उद्योग उभा केला आणि कालांतराने ते लाखोपती, करोडपती बनले, धंद्यामध्ये पैसा सारखा वाढत जातो.

            मोठमोठ्या उद्योगपतीचे आत्मचरित्र वाचले तर त्यांनी शून्यातून उद्योग सुरु केला आणि आता ते जागतिक पातळीचे उद्योगपती आहे. साधा एक रुपयाची तंबाखू-चुन्याची पुडी विकणारा व्यक्ती आज कोट्याधीश आहे. लक्षात घ्या हे वैभव नोकरी करणारी व्यक्ती कधीच प्राप्त करू शकत नाही.

            म्हणून मित्रांनो ! मी सांगतो म्हणून धंद्यात उतरा नोकरी करून स्वतःचा आयुष्याचं वाटोळ करून घेवू नका. अगदी कमीत कमी पैशात तुम्ही उद्योग करू शकता आणि लाखोपती होऊ शकता. धंद्यात फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे. ती म्हणजे धाडस, एकदा का धाडस निर्माण झालं कि तुम्ही कुठलाही उद्योग बिनधास्त करू शकता.

            धंदा किंवा उद्योग हा कुठलाही छोटा किंवा मोठा नसतो. कितीही मोठ्या पोस्टवर असला तरी नोकर हा नोकर असतो आणि उद्योग कितीही लहान असला तरी उद्योग करणारा व्यक्ती मालक असतो. मालक हा कुठलाही उद्योगाचा असो तो श्रेष्ठ असतो.
            आपल्या मराठी माणसांमध्ये कुठलाही चारचाकीचा फिरता उद्योग करतो म्हटल कि ‘कमीपणा’ (लाज) हा शब्द नेहमी आपले नुकसान करतो. पण आज तुम्ही बाजारात जावून बघा. बाजारामध्ये शेकडो लहान मोठी परप्रांतातील माणसं वाटेल ते रस्त्यावर विकायला घेवून बसतात आणि सहज हजारो रुपये कमवितात. त्यांना कशाचीच लाज वाटत नाही. कारण त्यांना मालक म्हणून घेण्याला गर्व वाटते. उद्योग छोटा असो कि मोठा मालक हा मालक असतो. त्याच्या कल्पनाला व विचारला प्रत्येक ठिकाणी वाव मिळते पण मग मराठी माणसाला का लाज वाटते. हे कोडं मात्र अजूनही सुटलं नाही. श्रमाने व इमानदारीने पैसा कमविण्यासाठी लाज वाटण्याजोगे काय ? वास्तविक पाहता नोकर म्हणून घेतल्यावर आपली मान शरमेने खाली जायला पाहिजे, पण मात्र ती गोष्ट करण्यात आपल्याला अभिमान वाटतो. म्हणजे आपलं डोकं ठिकाणावर आहे काय?

             माझ्या मतानुसार प्रत्येक मराठी माणूस जर उद्योग करायला लागेल तर जिकडे तिकडे त्याचे बंगले दिसायला लागेल. पण अशी स्थिती सध्या अस्तित्वात नाही. सर्व उद्योग धंदे, संपत्ती अस्तित्वात आहे. फक्त बिगर मराठी माणसाच्या हातात. फक्त मराठी माणसाचा हातात आले आहे. दुसऱ्याची सेवा करण्याचे अहोभाग्य ! ज्याला आपण नोकरी वरील वेलांटी काढल्यास नोकर बनतो पण नोकरी करण्यात नोकर बनण्यात आपल्याला धन्यता वाटते केवढे अहोभाग्य ! बरीचशी तरुण मंडळी वेळेचा सदुउपयोग करीत नाही गप्पा गोष्टी करण्यात वेळ वाया घालतात. तरुण मंडळींना छोटा उद्योग करून वेळेचा सदुपयोग कसा केला पाहिजे हेच कळत नाही. आपल्या मराठी माणसामध्ये तहान लागल्यावर विहीर खोदण्याची प्रथा आहे.

            तरुण मंडळी उद्योगी का बनू शकत नाही ? उद्योग का करू शकत नाही ? याची वेगवेगळी कारणे आहे त्यापैकी काही कारण मी तुमचा समक्ष मांडणार आहे.
कारण :- १) आपल्या हिंदू धर्मात भौतिक प्रगतीला काही स्थान नाही. परमार्थाकडे झुकलेले आपले सर्व तत्त्वज्ञान आहे. या जन्मात  चांगले काम केले तर पुढील जन्मात तुम्हाला सुख मिळेल, मरणानंतर स्वर्ग मिळेल अशी शिकवण आहे. मला हेच कळत नाही कि पुढचा जन्म कोणी पाहिला ? मित्रांनो वर्तमान काळ आणि वर्तमानाचा आनंद घेऊन आखलेले भविष्यातील योजना हेच तर जीवन आहे. मग मरणानंतर स्वर्ग कोणी पहिला ? तसेच आपल्या कानावर धार्मिक संतांची शिकवण सतत पडते, “ ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान !’’

२) लहान मुलांना ज्या गोष्टी सांगण्यात येतात त्यात लढाईतील शौर्याच्या गाथा सांगितलेल्या असतात. त्याही शिवाजी महाराज, झाशीची राणी, राणा प्रताप यांच्या पलीकडे जात नाही. एखाद्या व्यापाराने सात समुद्र पलीकडे जाऊन मोठा व्यापार केला, एखाद्या उद्योगपतीने परदेशात भारतीय मालाचे कारखाने काढून संपत्ती मिळवली अशा गोष्टी नसतातच. सर्व गोष्टी घट्टी, कट्टी, गरिबी, लुळीपांगळी, श्रीमंत, साधी राहणी, प्रामाणिकता, उच्च विचारसरणी अश्या विषयाभोवती असतात. मुलांची कर्तबगारी वाढावी, त्यांनी स्वतंत्र व्यवसायात उद्योगात रस घ्यावा असे त्यात काहीच नसते उलट लक्ष्मीची, पैशाची हेटाळणी करण्याऱ्या गोष्टी तो वाचत असतो किवा ऐकीत असतो.

३ ) आपल्या राजकीय व सामाजिक नेतृत्वात जेवढा उदो उदो केला जातो, तेवढा कर्तबगार उद्योजकाचा केला जात नाही.
४ ) भारतीय  तत्वज्ञानाच्या भाष्यकारांनी सतत दैववाद शिकवून आपल्याला नैराश्यवादी बनविले आहे.
५) महत्वाचे आणि शेवटचे कारण म्हणजे मराठी माणसाच्या मार्गात कोण अडथळे आणीत असेल तर त्या आपल्याच मराठी तरुणी होय. ह्या सर्व अनर्थाला कारणीभूत म्हणजे मराठी मुली आणि त्याचे आई-वडील. तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण बारकाईने निरीक्षण केल तर माझ म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल. असे कित्येक तरुण मी पहिले आणि प्रत्यक्ष मी स्वत: अनुभव घेतला की, त्यांचा धंदा आहे महिन्याला ते आठ – दहा हजार रुपये कमवीत आहे. पण मुलीकडील लोकांची मते आज उद्योगचालतो उद्याचं काय, जीवनाची सिक्युरिटी आहे का? आजच ठीक, उद्याचं काय? नोकरीमध्ये सिक्युरिटी असते. उद्योगवाल्याशी लग्न करायला मराठी मुली तयार नसतात. शून्यातून उद्योग उभा केला, दहा पंधरा हजार रुपयापर्यंत पोहोचला पुढे प्रगती सुरूच आहे. पण काय म्हणाव या कर्माला? कोणीच मुली देत नाही, शेवटी एका-दोघा तरुणांनी शून्यातून, दहा पंधरा हजार पर्यंत पोहचलेला धदा बंद करून हजार पंधराशे रुपयाची भिक्कार नोकरी मिळवली आणि आश्चर्य म्हणजे चांगल्या मुली त्यांच्याशी लग्न करायला तयार झाल्या.
             आता सांगा मला हजार पंधराशे रुपयात त्या कसला कपाळाचा सुखी संसार करणार? हजार पंधराशे रुपये मुलीना मेकपला तरी पुरतील का? मी लग्नाचा कॅन्डेड(canded) म्हणून बऱ्याच ठिकाणी फिरलो चोकशी केली हा काय कोचिंग घेणार, कोचिंग काय, आज आहे उद्या नाही? काय दम आहे ह्या कामामध्ये, अनेकाशी स्वता: भेट घेतली आणि मला प्रत्यक्ष अनुभव आला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण जवळ जवळ ९८% मुलींना उद्योगपती नवरा नको असून त्यांना आपला जीवन साथीदर म्हणून नोकरच हवा असतो. काही मुलीना डॉक्टर, इन्जिनिअर, तेही नोकराची भूमिका बजावत असतात, म्हणून नोकरच हवा असतो मुलीची दुसरी सर्वोत्तम पसंती असते बँकेतील नोकरी, शाळेतील शिक्षक, जो शाळेत दहा ते बारा लाख देऊन नोकर बनणे पसंद करतो. अथवा मित्रांनो विचार करा कुठूनही तरुणीना नोकरच नवरा म्हणून हवा असतो. मला आश्चर्य वाटते की, नोकराशी विवाह करण्यात त्यांना कसला आनंद मिळतो ? आणि त्यापेक्षा दु:खजनक गोष्ट म्हणजे जावयाला हुंडा देणाऱ्या पित्याची सरकारी नोकर असेल किवा बँकेत नोकरी असेल तर हुंडा दोन ते तीन लाखाच्या खाली नाही तरी मुलीच्या पित्याची जीव ओतून धावपळ आणि शाळेतला शिक्षक किवा प्राध्यापक असेल तर विचारूच नका ? अहो कंपनीत नोकरीला असणाऱ्यानाही डिमांड पण मला एक गोष्ट कळत नाही की, नोकरी वाल्यांना कोणत्या उत्त्येजनार्थ हुंडा देता आणि कशाबद्दल ? तो नोकर हि भूमिका चांगली बजावतो म्हणून ?
           भिकाऱ्याला कितीही पैसे दिले तरी तो भिक मागावयाच थोडच थांबवणार आहे ? माझं अस तरुणीच्या  आईवडीलाच्या विषयही मत आहे कि जर तुम्हाला हुंडा घ्यायचाच असेल तर उद्योगपती किवा उद्योग सुरु करणाऱ्या व्यक्तीस दया. तो तुमच्या हुंडा रुपी बक्षिशाने  आपला व्यवसाय वाढीला आणू शकतो आणि तुमच्या मुलीला राणी सारखे वैभव देऊ शकतो. शेवटी हुंड्याच्या अर्थ जावयाने आपल्या मुलीला सुखात ठेवावे ऐवढेच ना, मग तुमच्या मुलीला सुखात मालक ठेवेल की नोकर ?
           मराठी तरुणीच्या आणि तिच्या आईवडीलाच्या ह्या घातक प्रवृतीमुळे मराठी तरुणांना त्यांच्या मानाविरुध्य दुसऱ्याची नोकरी करावी लागते. गुलामगिरी स्वीकारावी लागते. कारण मुलीच्या मते नोकराची पत्नी  होणे म्हणजे तिला प्रतिष्ठेचे वाटते. सन्मानाचे वाटते आणि जे मुलीला व मुलीच्या आईवडिलांना पसंद असते, ते मराठी तरून करतात किवा तरुणाला नाईलाजास्तव  करणे भाग पडते. कारण त्यांना हवी असते सुंदर, सुशील आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको.
               सर्व वरील बाबीची तुमच्याशी चर्चा केल्यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, मुलीना असा नोकरच पती म्हणून का आवडतो? याचा सारासार खोल विचार केल्यानंतर व काही तरुणीची, तसेच तरुणीच्या आईवडिलांची मुलाखत घेतल्यानंतर असे निदर्शनास आले की, मुलीला नियमित पगार मिळणारी सुरक्षित नोकरी पाहिजे, दुसरा मुद्दा कदाचित असाही असू शकतो की दुसऱ्याची गुलामगिरी बिना तक्रार करतात त्यांना आपलेही गुलाम व्हायला लाज वाटणार नाही कदाचित असाही मुलीच्या विचाराचा कल असू शकतो.
 माझ्या मते संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र जर बदलावयाचे असेल तर आणि संपूर्ण मराठी माणसाला उद्योगमय करायचे असेल तर सर्वात मोठे  चित्र बदलविण्याचे सामर्थ्य फक्त मराठी तरुणीत आणि त्यांच्या वडिलांतच आहे हे आपल्याला कळून येईल.
 खरे म्हणजे उद्योग करण्यासाठी मेहनत, धाडस, समंजस, सखोलं विचारकरण्याची शक्ती आणि सतत बुद्धीचा वापर करण्याची ताकत असलेला व्यक्तीच उद्योग करू शकतो आणि स्वत:ला मालक म्हणून समजामध्ये गीणू शकतो. अशा दहा चांगले गुण असलेल्या गुणवान व्यक्तीला मुली देण्यासाठी, तरुणीनीच्या आई-वडिलांनी निर्धार केला पाहिजे की, आम्ही (तरुणी) उद्योगपतीशी लग्न करू आणि हुंडा द्यावयाचा असेल तर तो फक्त उद्योग करणाऱ्यानाच मिळेल. नोकरी करणाऱ्याशी आम्ही कधीच लग्न करणार नाही. वाटल्यास अविवाहित राहू.
 मग बोला आता तुम्ही काय ठरवलं, जर तुम्ही अगदी नोकर व्हायचे ठरविले असेल तर मी तरी काय करणार? जर उद्योग हमखास पगार मिळण्याची ग्यारंटी म्हणून तुम्ही नोकरी करायचा अगदी निश्चय केला असेल तर माझी काही हरकत नाही.
मित्रांनो! मला जे समाजात चित्र दिसल आणि ज्या गोष्टी मी प्रत्यक्ष अनुभवल्या त्या जीव तोडून, जीव ओतून तुमच्या समक्ष मांडण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे की वरील गोष्टीचा तुमच्यावर योग्य परिणाम होईल व तुम्ही तुमच्या आंतरमनाचे ऐकालं व क्षणही वाया न घालता योग्य कामाला लागालं.
 उद्योगी व्यक्ती नेहमी आपल्या कामाचा व आपल्या उद्योगाचा व्याप कसा मोठा करता येईल हे बघतो.
·         उद्योग करणाऱ्या व्यक्ती जवळ वेळ कमी असतो. तो आपल्याही उद्योगात रममाण असतो आणि त्याला समोर वाढविण्याचे काम करत असतो.
                                                                                                                      जगदीश र. वांदिले

                                                                                                                        ९८६०६९००६३

No comments:

Post a Comment